SHREE VISHWAPRIYA PEN Verified

आयुर्वेदाचार्य व पंचकर्म पारंगत. योग तज्ञ

5.00 / 5
Add to favorites Compare
Wellcome To Shree Vishwapriya Aayurvedic Chikitsalaya And Panchkarma Kendra Pen Raigad- Dr. Supriya Chetan Mhatre Chikhlekar (B.A.M.S Mumbai/M.D. Ayurveda) Ayurvedacharya and an expert in panchakarma. Yoga expert आयुर्वेदाचार्य व पंचकर्म पारंगत. योग तज्ञ

SHREE VISHWAPRIYA PEN 

Ayurved Chikitsalaya And Panchakarma Kendra In Pen City.

Dr. Supriya Chetan Mhatre (Chikhlekar) B.A.M.S Mumbai/M.D. Ayurveda
Ayurvedacharya and an expert in panchakarma. Yoga expert आयुर्वेदाचार्य व पंचकर्म पारंगत. योग तज्ञ

Ayurveda believes that the entire universe is composed of five elements: Vayu (Air), Jala (Water), Aakash (Space or ether), Prithvi (Earth), and Teja (Fire). These five elements (referred to as Pancha Mahabhoota in Ayurveda) are believed to form the human body’s three basic senses of humor in varying combinations.

SHREE VISHWAPRIYA PEN

SHREE VISHWAPRIYA PEN

SHREE VISHWAPRIYA PEN

Vata

Vata is characterized by the properties of dry. cold, light, minute, and movement. All movement in the body is due to the properties of Vata. Pain is the characteristic feature of deranged Vata. Some of the diseases connected to unbalanced Vata are flatulence, gout, rheumatism, etc.

Pitta

Pitta represents metabolism: It is characterized by hotness, moisture, liquid, sharpness, and sourness, and its chief quality is heat. It is the energy principle that uses bile to direct digestion and enhance metabolism. It is primarily characterized by body heat or burning sensation and redness.

Kapha

Kapha is the watery element it is characterized by heaviness, cold, tenderness, softness, slowness, lubrication, and the carrier of nutrients. It is the nourishing element of the body. All soft organs are made by Kapha and it plays an important role in the perception of taste together with nourishment and lubrication.

SHREE VISHWAPRIYA PEN

Ayurveda has rightly emphasized that health is not only the state of not having the disease but, it is the state of the normalcy of Dosha, Dathu, Agni, and Malakriya. It also includes the Prasanna Atma (soul), Indriya (sense organs) and Manas (mind).

Three doshas of the body, Vata, Pitta, and Kapha, which broadly represent the nervous system, the metabolic system, and the nutritive system, keep the human body in balance. Whenever the delicate balance between these doshas is disturbed, a disease may be manifested. The main objective of the Ayurvedic system of treatment is to restore the original state of equilibrium between the doshas. In order to achieve the same Ayurveda has advocated certain regimens and treatment modalities such as Dinacharya, Rutucharya, Vega Adharana, Rasayana–Vajikarana, and Panchakarma.

Panchakarma is a method of cleansing the body of all unwanted waste after lubricating it. Panchakarma is 5 (five) in number; hence the term PANCHA (five) – KARMA (procedures). Panchakarma treatment is unique in the sense that it includes preventive, curative, and promotive actions for various diseases.

SHREE VISHWAPRIYA PEN

SHREE VISHWAPRIYA PEN

What is Five Karma? – पंचकर्म म्हणजे काय?

The body can be divided on the basis of the parts that need cleansing. Head, GIT (gastro-intestinal system), upper and lower. The five main Karmas to cleanse the complete body are

  1. Vamana (therapeutic emesis) – induced vomiting helps clear the upper gastro till the duodenum (end of stomach) and part of the respiratory tract.
  2. Virechanam (purgation) – induced purgation clears the lower gastro from the duodenum (end of stomach) till the exit.
  3. Anuvasana (enema using medicated oil) – Oil enema helps lubricate the rectal area and take all the lipid-soluble waste out through the anus.
  4. Nasyam – nasal instillation of medicated substances helps clear the respiratory tract and paranasal sinuses.
  5. Astana Vasti (Therapeutic Decoction Enema) – decoction enema cleanses the area from the transverse colon to the anus.

विरेचन (Virechan) – SHREE VISHWAPRIYA PEN

विरेचन हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. विरेचन म्हणजे विशेष प्रकारचे रेचन अर्थात शौचाच्या मार्गाने शरीराची शुद्धी करणे होय. शास्त्रोक्त पद्धतीने घडवून आणलेले जुलाब असे याचे स्वरूप असते. परंतु, येथे शौचमार्गाने केवळ विष्ठा बाहेर काढणे अभिप्रेत नसून जुलाबांद्वारे शरीरातील वाढलेले दोष बाहेर काढणे अपेक्षित असते. त्यासाठी काही विशिष्ट औषधांचा वापर केला जातो. त्वचारोग, कावीळ, प्लीहारोग, नागीण, जलोदर, हातापायांची आग होणे अशा अनेक व्याधीत विरेचन दिले जाते.

विरेचनाचे कार्य शरीरातील वातपित्त व कफ या दोषांपैकी प्रामुख्याने पित्त ह्या दोषावर होते. विरेचन ही पित्ताने होत असलेल्या रोगांवरील श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. पित्त हे प्रामुख्याने शरीरातील जठर, आतडे ह्या पचनसंस्थेतील अवयवांत असते. जेव्हा पित्तामुळे विविध रोग होतात, तेव्हा ह्या वाढलेल्या पित्ताला सर्वात जवळच्या मार्गाने म्हणजे आतड्यातून शौचावाटे बाहेर काढणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी दिली जाणारी औषधे अधोगामी म्हणजे खालच्या दिशेला येण्याच्या स्वभावाची असतात. त्यामुळे ही औषधे सेवन केल्यावर सर्व शरीरातील पित्तदोष खालच्या दिशेला पोटात आणून शौचावाटे बाहेर काढतात.

बस्ती- SHREE VISHWAPRIYA PEN

बस्ती ही आयुर्वेदातील “अर्ध चिकित्सा” मानली जाते. कोणत्याही अवस्थेत, काळात, वयात, आणि आजारात बस्ती चिकित्सा ही उपयुक्त ठरते.

बस्ती म्हणजे एनिमा असा व्यवहारातील फार भयंकर गैरसमज आहे.कृतीतील साधर्म्यमुळे हा गैरसमज झाला आहे. परंतु अंगाला औषधी सिद्ध तेले लावून पोटामध्ये विशिष्ट पद्धतीचे स्नेहपदार्थ घेउन आणि संपूर्ण अंगाला विशिष्ट शेक करून बस्ती करावयाचा असतो. हे करण्यापूर्वि शरीरातील अग्निमाद्य व अजीर्ण औषधी ने दूर करावे लागते.

शरीरातील वात दोष कफ व पित्त दोषांना काम करण्यास प्रवृत्त करत असतो. अशा वात दोषासाठी अशी औषधी सिद्ध तेले अंतर्बाह्य वापरणे गरजेचे असते. त्याबरोबर बस्ती उपचार ही निम्मी उपचार पद्धती आहे.

बस्ती उपयुक्त आजार :

  • पाठीचा मणका आणि इतर सर्व वातविकार
  • कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी
  • हातापायला मुंग्या येणे
  • हात पाय वळणेकिवा सुकणे,
  • स्लिप डिस्क
  • स्पौण्डिलोसिस, कौड कोम्प्रेशन, सायटिका
  • फ्रोजेन शोल्डर, टेनिस एल्बो
  • किडनी स्टोन, अथवा किडनी चे आजार
  • स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी
  • वंध्यत्व
  • पक्षाघात
  • पोटाच्या व पचना सबंधित तक्रारी
  • मलावष्टंभ
  • वजन वाढणे अथवा कमी होणे
  • मूळव्याध
  • त्वचेचे आजार
  • मधुमेह इ. सर्व आजारात बस्ती उपचार पद्धती अतिशय सुंदर लागू पडते.

मुस्तादी यापन, दशमूळ-धन्वंतर, बला-गुडूच्याडी, पिपल्यादी असे निरनिराळे बस्ती शरीरातील अनेक व्याधीसाठी आयुर्वेदाने संगितले आहेत.

बस्ती उपचाराचा दूसरा फायदा म्हणजे कोणत्याही आजारात बस्ती उपचार केल्यामुळे हृद्य, मस्तीष्क आणि वृक्क या तीन मर्मांचे आरोग्य आपोआपच सुधारले जाते.या गोष्टीची गरज कमी जास्त प्रमाणात पस्तीशीच्या नंतरच्या प्रत्येक व्यक्तीस भासते. या बस्तीमुळे हार्ट अटॅक, मेंदूत रक्तस्त्राव, पक्षाघात, किडनी फेल्यर यासारख्या दुर्धर व्याधी भविष्यात उत्पन्न न होण्याची व्यवस्था आपोआपच होते.

नस्य (Nasya) – SHREE VISHWAPRIYA PEN

नस्य हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे.

आयुर्वेदानुसार गळ्याभोवतालच्या हाडाच्या वरील भागात असलेल्या सर्व अवयवांच्या विकारांवर नस्याचा उपयोग होतो. नस्याचा उपयोग रोगावस्थेत होतो तसेच स्वास्थ्य रक्षणासाठीही होतो. त्यामुळे नस्य हे पंचकर्मातील एकच असे कर्म आहे जे रोज केले जाऊ शकते. आयुर्वेदात नाक हे शिरस्थानाचे म्हणजेच डोक्याचे दार आहे असे म्हटले आहे. या आधाराने नस्याची कार्यपद्धती स्पष्ट होण्यास मदत होते.

नस्य करण्यापूर्वी चेहऱ्याला मालिश करून शेकले जाते. नस्याचे त्याच्या परिणामानुसार शिरोविरेचन व स्नेहन असे दोन प्रकार आहेत. शिरोविरेचन म्हणजे शिरस्थानी जमा झालेले दोष बाहेर काढणे. ज्यावेळी टाळू, कंठ आणि शिरोभाग यांमध्ये कफ जमा झालेला असतो, त्यावेळी शिरोविरेचन नस्याचा उपयोग करतात. तसेच जुनाट सर्दी, त्यामुळे निर्माण होणारा डोक्याचा जडपणा, जीभेला चव नसणे, डोकेदुखी, अर्धशीशी, आकडी येणे, वासाची जाणिव न होणे आणि गळ्याच्या हाडाच्या वरील भागात कफामुळे होणारे विकार यांमध्येही शिरोविरेचन नस्याचा उपयोग केला जातो. स्नेहन नस्य हे मान, खांदा आणि छाती या भागांतील मांसपेशींचे बल वाढविण्यासाठी उपयोगात येते. तसेच डोक्याचा हलकेपणा, वातामुळे होणारे शिरोरोग, अकाली दात पडणे, डोक्याचे व दाढीचे केस गळणे, कान दुखणे, कानांमध्ये आवाज येणे, आवाज फुटणे, तोंड कोरडे पडणे, केस पांढरे होणे, चेहऱ्यावर अकाळी सुरकुत्या पडणे तसेच मोतीबिंदू या विकारांमध्ये स्नेहन नस्याचा उपयोग सांगितला आहे.

स्नेहन (Snehan) – SHREE VISHWAPRIYA PEN

स्नेहन ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची तांत्रिक प्रक्रिया आहे व वाढलेला वातदोष कमी करण्याचीही प्रक्रिया आहे. स्नेह म्हणजे स्निग्धपदार्थ. ज्यामुळे शरीराला स्निग्धत्व येते, मऊपणा येतो, शरीरात ओलावा निर्माण होतो त्या प्रक्रियेला ‘स्नेहन’ असे म्हणतात.

आयुर्वेदानुसार शरीरातील दोष आवश्यक प्रमाणापेक्षा वाढले व ते शरीरभर पसरलेले असले, शरीरात खोलवर मुरलेले असले, तर त्यांना शरीराबाहेर काढण्यासाठी तोंड, गुदा किंवा अन्य सुयोग्य छिद्रापर्यंत नेणे आवश्यक असते. स्नेहनामुळे असे दोष सुटतात, पातळ होतात व त्यांना गती मिळते.

स्नेहनाचा उपयोग स्वतंत्र चिकित्सा म्हणून वाढलेल्या वातासाठी सांगितला आहे. स्नेहनाच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे आभ्यंतर स्नेहन. यात पोटातून स्नेह घेतले जाते. तसेच स्नेह अन्नासोबत किंवा नुसताही घेता येतो. दुसरी पद्धत म्हणजे मालिशद्वारा स्नेह शरीराला लावणे. तसेच गुदावाटे, योनीवाटे स्नेह शरीरात सोडणे, नाकात व कानांत स्नेह टाकणे, स्नेहपदार्थांच्या गुळण्या करणे ह्या प्रकारच्या स्निग्ध पदार्थांच्या उपयोगाला ‘बाह्य स्नेहन’ म्हणतात.

स्नेहनासाठी वापरावयाच्या स्नेहाचे प्रमाण, रोगानुसार व ऋतूनुसार स्नेहपदार्थाची निवड, स्नेहनाची वेळ, कालमर्यादा, स्नेहन कोणाला द्यावे, स्नेहन कोणाला देऊ नये, स्नेहन योग्य झाल्याची लक्षणे या सगळ्यांचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात केले आहे. स्नेहन करणारे पदार्थ हे पातळ, सूक्ष्म म्हणजे खोलवर जाऊन काम करणारे, लवकर पसरणारे, स्निग्ध, बुळबुळीत, मऊ, पचायला जड आणि थंड असतात. हे पदार्थ शरीरावर तात्काळ प्रभाव दाखवत नाही.

रक्तमोक्षण (Raktamokshana) – SHREE VISHWAPRIYA PEN

एखाद्या रोगाच्या उपचारासाठी शरीरातून त्वचेच्या मार्गाने रक्त बाहेर काढणे म्हणजे रक्तमोक्षण होय. वात, पित्त व कफ हे तीन दोष आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा वाढल्यास काही वेळा ते शरीरातील रक्ताला त्याचे काम नीट करू देत नाही. अशा रक्ताला दूषित रक्त म्हणतात. या दूषित रक्तामुळे शरीरावर फोड येणे, खाज सुटणे असे काही त्वचेचे विकार होतात; तर तोंड येणे, कडू, आंबट घशाशी येणे, योनीवाटे अकारण रक्त जाणे, वातरक्त (सांधेदुखीचा एक प्रकार) असे अनेक रोग होतात.

रक्तमोक्षणालाच रक्तविस्त्रावण किंवा शोणित विस्त्रावण असेही म्हणतात. कधीकधी या दूषित रक्ताचा प्रभाव सर्व शरीरभर दिसतो, तर कधी तो एखाद्या भागापुरता मर्यादित असतो. दूषित रक्ताचा प्रभाव कुठवर पसरलेला आहे त्यानुसार रक्तमोक्षणाची पद्धत ठरविली जाते. रक्तमोक्षणाचे मुख्यत: दोन प्रकार पडतात

(१) शस्त्रकृत रक्तमोक्षण : त्वचेवर एखादी चिर मारून किंवा सुई टोचून रक्त बाहेर काढले जाते, त्याला शस्त्रकृत रक्तमोक्षण असे म्हणतात. याचे दोन प्रकार पडतात –

(i) सिरावेध : यात रक्त काढण्यासाठी सुईचा वापर होतो. जर दूषित रक्ताचा प्रभाव सर्व शरीरभर जाणवत असेल, तर त्वचेवरून स्पष्ट दिसणाऱ्या रक्तवाहिनीत सुई टोचून तिच्याद्वारे रक्त बाहेर काढले जाते. ही पद्धत रक्तदान करतेवेळी अवलंबविण्याच्या प्रक्रियेप्रमाणे आहे.

(ii) प्रच्छन : दूषित रक्ताचा प्रभाव एखाद्या भागापुरता मर्यादित असेल, तर प्रच्छन पद्धतीने रक्तमोक्षण केले जाते. यात त्या भागावरील त्वचेवर चिरा मारून आवश्यक तेवढा रक्तस्त्राव होऊ दिला जातो. या ठिकाणी दूषित रक्ताचा प्रभाव त्वचेखाली खूप खोलवर पसरलेला नसेल, तर ही प्रक्रिया लाभदायक ठरते. परंतु, दूषित रक्ताचा प्रभाव थोड्या खोलपर्यंत पसरलेला असेल, तर केवळ वरवर चिरा मारून उपयोग नाही. अशावेळी ‘शृंग व अलाबू’ या दोन उपकरणांचा वापर केला जातो.

(२) अशस्त्रकृत रक्तमोक्षण : शस्त्राचा वापर न करता केले जाणारे रक्तमोक्षण म्हणजे अशस्त्रकृत रक्तमोक्षण होय. यासाठी बिनविषारी जळवांचा वापर होतो. जळू ही एक रक्त शोषणारी जलचर अळी आहे. काही जळवा विषारी असतात, परंतु त्यांचा रंग बिनविषारी जळवांपेक्षा फार वेगळा असतो. दूषित रक्ताचा प्रभाव एखाद्या भागापुरता मर्यादित असेल, तर जळूचा वापर होतो. जळू त्वचेला चावा घेऊन पकडते व त्या ठिकाणचे दूषित रक्त शोषून घेते. एका मर्यादेपर्यंत रक्त शोषल्यावर जळू चावा सोडते किंवा आवश्यक तेव्हा तिचा चावा सोडविण्यासाठी तिच्या तोंडावर काही औषधी सोडण्यात येतात.

Ayurveda

Ayurveda ( = अयु + वेद; literally meaning: ‘Veda of Life’ or ‘Science of Longevity’) is a major and superior medical system with its roots in the Indian subcontinent. Ayurveda is widely practiced in India, Nepal, and Sri Lanka, where almost 80 percent of the population uses it. Ayurveda is one of the oldest medical systems in the world. Ayurveda is an Indian medical science. Medical science is the branch of science that deals with keeping the human body healthy, getting rid of a disease or It is for reducing and increasing life.

Hitahitam Sukham Dukhamayustasya Hitahitam.
Manan Cha Tacha Yatroktmayurveda: Sa Uchyate. — (Charaka Samhita 1/40)
The texts of Ayurveda consider the imbalance of the three bodily doshas (Tridosha = Vata, Pitta, Kapha) as the cause of disease and the condition of Samadosha as the cause of health. Ayurveda is also called Triskandha (three-shouldered) or Trisutra, these are the three Skandhas or Trisutras – Hetu, Linga, and Medicine. Similarly, the eight parts of the entire Ayurvedic medicine are considered (Ashtang Vaidyaka), these eight parts are – Kayyatirapya, Salyatantra, Shalakyatantra, Kaumarbhritya, Agadatantra, Bhootvidya, Rasyatantra, and Vajikaran.

Some people give too much importance to the theory and practice of Ayurveda and consider it as a science given by Brahma Himself for the benefit of the people. Others, instead, consider it a protoscience, a trans-science system.

Yoga Sanskrit: योग, pronounced is a group of physical, mental, and spiritual practices or disciplines that originated in ancient India and aim to control and still the mind, recognizing a detached witness-consciousness untouched by the mind (Chitta) and mundane suffering (Duḥkha). There is a wide variety of schools of yoga, practices, and goals in Hinduism, Buddhism, and Jainism, and traditional and modern yoga is practiced worldwide.

योग संस्कृत: योग, उच्चार हा शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पद्धतींचा किंवा अनुशासनांचा समूह आहे ज्याची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि मन (चित्त) आणि सांसारिक दुःख (चित्त) आणि सांसारिक दुःखाने अस्पर्शित अलिप्त साक्षी-चेतना ओळखून मनावर नियंत्रण ठेवण्याचे आणि अजूनही मनावर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. दुख्खा). हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात योग, पद्धती आणि उद्दिष्टांच्या विविध शाळा आहेत आणि जगभरात पारंपारिक आणि आधुनिक योगाचा सराव केला जातो.

SHREE VISHWAPRIYA PEN

Digital India-X: Complete Digital Marketing Solutions – Domain + Hosting + Website + Email with Free Website Development, Directory Listing, SEO:  www.digitalindax.com
Startup India-X: Helping Businesses and companies Innovate and transform – Everything Your Business Needs In One Place: Company Registration, Startup Registration, All Annual Compliances Other Licenses and Certifications: www.startupindax.com
EXPLORE YOUR CITY BUSINESS GUIDE– www.citiez.in
EXPLORE YOUR CITY Team Awaits your Business to be given Global Exposure!
Socialize with us. We always love hearing from our clients.
Share stories and exchange ideas on business success. Facebook, Twitter & LinkedIn, etc.

Is Panchakarma really helpful?
Panchakarma is not only for treating a few diseases. It can correct a variety of ailments very effectively. Panchakarma improves health and promotes the self-healing quotient of the body. It fine-tunes the efficient functioning of all the body's organs.